- विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा
सोलापूर ता. ७ : विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा. आश्वाशित प्रगती योजना लागु करावी, पाच दिवसाचा आठवडा या प्रमुख मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुरातील विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती सोमवारी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन काशीद व सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे यांनी संयुक्तपणे दिली

राज्य शासनाने सर्व सरकारी कर्मचारी व प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु विद्यापीठ कर्मचारी याना लागू केला नाही आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना अर्धवट लागू केला. कारण काय तर या अगोदर लागू केलेल्या कालबध्द पदोन्नतीसाठी उच्च व तंत्र शिक्षण खात्याने वित्त विभागाची परवानगी घेतली नाही. म्हणून शासन निर्णय रद्द केला तो पुनर्जिवित करावा यासाठी संघटनेने तीन दिवसांचा संप केला होता. शासनाने सदरचे प्रश्न सोडविण्याचे दिलले आश्वासन पाळले नाही. दोन्ही संघटनेने वेळोवेळी निवेदन दिली. राज्यातील सुमारे १०० आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री याना निवेदने दिली. परंतु शासनाने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. यामुळे आमचे १० टक्के कर्मचारी सहाव्या वेतन आयोगावरच सेवानिवृत्त झाले. काहींनी सवानिवृती वेतन मिळण्याचा प्रस्ताव पाठविला नाही.
प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू आणि विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही या भेदभावामुळे
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे . शासनाच्या वेळकाढु पणाच्या धोरणांमुळे कर्मचार्यांचे आर्थिक नुकसान होत असुन आम्हाला नाइलाजाने हा निर्णय घावा लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाने ७ वा वेतन आयोग व आश्वाशित प्रगती योजना याबाबत तात्काळ या अधिवेशनात निर्णय घ्यावा अन्यथा उच्च शिक्षणाचा महत्वाचा घटक असलेल्या कर्मचार्यांना नाईलाजाने येत्या परिक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घालावा लागेल.असा गंभीर इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे.

यावेळी सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे चेअरमन राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष दत्ता भोसले, सरचिटणीस अजितकुमार संगवे तसेच महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे सोमनाथ सोनकांबळे, रविराज शिंदे, संघटनेचे सचिव रविकांत हुक्केरी, विद्यापीठ ऑफिसर फोरमचे मलिक रोकडे, कास्तट्राईब संघटनेचे मलकारसिद्ध हैनाळकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वसंतराज सपताळे आदी उपस्थित होते.