Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

दि.6 : WhatsApp Pay (व्हॉट्सअ‍ॅप पे) भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीला जवळपास तीन वर्षे थांबावे लागले. चाचणी यापूर्वीच केली गेली आहे आणि काही वापरकर्त्यांना या चाचणीत सहभागी करून घेण्यात आले होते.

WhatsApp नुसार आता लोक त्यातून पैसे पाठवू शकतात. आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्यास, आपण व्हॉट्सअ‍ॅप पे सक्रिय करू शकता. WhatsApp वरुन Money Transfer करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपला भारतात UPI बेस्ड पेमेंट सर्व्हिस लाँच करण्याची परवानगी मिळाली आहे. रिपोर्टनुसार, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) भारतात व्हॉट्सअ‍ॅपला UPI बेस्ड सिस्टम लाँच करण्याची परवानगी दिली आहे.

भारतात सध्या 40 कोटी व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहेत. त्यापैकी निवडक केवळ 2 कोटी लोकांनाच व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट ऑप्शन मिळणार आहे. कंपनीने एका ट्विटद्वारे या फीचरबाबत माहिती दिली आहे.

WhatsApp Pay चं भारतात गेल्या दोन वर्षांपासून बीटा टेस्टिंग सुरू आहे. पेमेंट प्रक्रियेत येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आलेलं नाही. पण आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात लाँच होणार आहे. ही सर्व्हिस यूपीआयवर (UPI)आधारित आहे. ही सर्व्हिस सुरू झाल्यानंतर युजर्सला कधीही आणि कुठेही पैसे पाठवता येणार आहेत.

whatsapp ओपन करून स्क्रिनवर उजव्या हाताला, टॉपला तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा. तेथे Payments ऑप्शनवर जा आणि Add payment method वर टॅप करा. तेथे विविध बँकांचे ऑप्शन मिळतील. बँकेचं नाव सिलेक्ट करा, त्यानंतर बँकेला लिंक असलेल्या मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन होईल. त्यासाठी SMS द्वारे व्हेरिफाय करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. यावेळी युजरने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि बँक अकाउंटशी लिंक असलेल्या नंबर सारखा असल्याची खात्री करा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, UPI पिन जेनरेट करावा लागेल.

त्यानंतर WhatsApp Pay वर ट्रान्झेक्शन करण्यासाठी, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्याचं चॅट ओपन करा, आणि अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर Payment वर टॅप करा आणि किती रक्कम पाठवायची आहे, ती एंटर करा. त्यानंतर UPI टाकून, पेमेंट होईल आणि याचा कन्फर्मेशन मेसेजही येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *