आज शनिवारी दि.14 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 135 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 104 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 132 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 1662 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1527 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 33 हजार 101 इतकी झाली आहे. यामध्ये 20,430 पुरुष तर 12,671 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 981 जणांचा मृत्यू झाला आहे यात 702 पुरुष तर 279 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 887 आहे .यामध्ये 1 हजार 373 पुरुष तर 514 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 30 हजार 233 यामध्ये 18,355 पुरुष तर 11,878 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 1
बार्शी –नागरी 5 तर ग्रामीण 0
करमाळा –नागरी 0 ग्रामीण 0
माढा – नागरी 2 तर ग्रामीण 26
माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 28
मंगळवेढा – नागरी 3 ग्रामीण 0
मोहोळ – नागरी 6 ग्रामीण 5
उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3
पंढरपूर – नागरी 13 ग्रामीण 34
सांगोला – नागरी 2 ग्रामीण 5
दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2
आजच्या नोंदी नुसार नागरी – 31 तर ग्रामीण भागात 104 असे एकूण 135 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.