Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस व आयसीजेएस या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे त्याबद्दल दिनांक 04 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे मा. हेमंत नागराळे, नूतन पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे हस्ते राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली यांचे कडून प्राप्त झालेले राष्ट्रीय पारितोषिक व प्रमाणपत्र सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले आहे.

पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख यांनी महाराष्ट्र पोलीस व सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर उंचावीले आहे. आजतागायत इकबाल शेख यांनी १० सुवर्ण, ७ रौप्य, ११ कांस्य व १ राष्ट्रीय पारितोषिक व पदकाची कमाई करून यशाचे शिखर गाठले आहेत. त्यांचे या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नाव देशपातळीवर उंचावीले आहे. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे सदर कार्यक्रमामध्ये श्री. एस. जगन्नाथन अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. अतुलचंद्र कुलकर्णी, अप्पर पोलीस महासंचालक, श्री. रंजनकुमार शर्मा, श्री. संभाजी कदम पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे व इतर वरीष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम पार पडला असून महाराष्ट्र पोलीस दलातील व सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांचेकडून पोलीस हवालदार इक्बाल शेख यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *