एकनाथ ‘भाऊ’ खडसे यांनी अखेर हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला असून येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
मागील काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या वारंवार विविध वक्तव्यावरून भाजपला धक्के मिळत होते. आज खडसे यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र प्रसिद्ध केले. त्यांनी भाजप पक्ष सोडला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, 23 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. महाराष्ट्राचे जाण असलेले नेते राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. त्यांचे स्वागत आहे. भाजपात झालेल्या अन्यायामुळे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ खडसेंच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केले आहे. रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या तरुण तुर्कांनी सोशल मीडियावर एकनाथ भाऊ वेलकम अशा पोस्ट लिहिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.
Welcome
एकनाथ खडसे साहेब!
Eknathrao Khadse अशा पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Leave a Reply