मुंबई दि. 17 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसते. मुंबईत 18 सप्टेंबरपासून (आज मध्यरात्री) कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.
केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सुरक्षित अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र त्यांनाही सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. यादरम्यान धार्मिक स्थळांसह कुठेही कुठल्याही प्रकारची जमवाजमव करण्यास मनाई आहे.
वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथिल करत आहे.