Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

कोरोना वाढतोय ; आज नवे पॉझिटिव्ह 610 ; जाणून घ्या तालुक्यातील…

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरूवारी दि.10 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 610 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 378 पुरुष तर 232 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 260 आहे. आज 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 4037 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3427 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 526 इतकी झाली आहे. यामध्ये 9454 पुरुष तर 6072 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 452 जणांचा मृत्यू झाला आहे यात 310 पुरुष तर 142 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 859 आहे .यामध्ये 3 हजार 44 पुरुष तर 1815 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 10 हजार 215 यामध्ये 6100 पुरुष तर 4115 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -9

बार्शी – 199

करमाळा – 84

माढा – 43

माळशिरस – 106

मंगळवेढा – 41

मोहोळ – 5

उत्तर सोलापूर – 2

पंढरपूर – 67

सांगोला – 37

दक्षिण सोलापूर – 8

एकूण 610 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *