Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13 News Network

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बहुप्रतीक्षेत असणारा लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमांचे
पालन करून येत्या २७ डिसेंबरला गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर साजरा होणार आहे.अशी माहिती शहाजी पवार यांनी दिली. शुक्रवारी दि.20 नोव्हेंबर रोजीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमंगल फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या विवाह सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज आहे, आणि ती सगळ्या पूर्वतयारीला लागली आहे. लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १४ वे वर्ष असून आजवर २ हजार ८८१ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. यंदाही या सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प आहे. या सोहळ्याला आता एका सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे.

इच्छुकांना या सोहळ्याची अधिक माहिती व्हावी यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल साखर कारखाना, लोकमंगल मल्टीस्टेट, लोकमंगल जीवक हॉस्पिटल आदि ठिकाणी १२५ माहिती केन्द्रे उभारण्यात आली आहेत. हा विवाह सोहळा सर्वधर्मीय असल्याने हिंदू, बौद्ध, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन अशा कोणत्याही तरुण-तरुणींना या सोहळ्यासाठी नाव नोंदणी करता येईल.

सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाचे अनुदान मिळते. या सोहळ्यात विवाह होणाऱ्यांना ते अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन मदत करील. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, व-हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मामांकरिता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बाळकृष्ण स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिले जाते.

तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणी सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या कार्यालयात सुरू आहे. या विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते. याच बरोबर वधू-वरास कोणता व्यवसाय करावयाचा असेल तर विशेष बाब म्हणून कर्ज देखील मिळवून दिले जाते.अशी माहिती यावेळी देण्यात आली.

संपर्कासाठी पत्ता :- लोकमंगल फाऊडेशनचे
ऑफिस 13 अ,सह्याद्री कॉलनी, सोलापूर 413003 फोन नंबर 0217 2322480, मो. नं.
9657709710 नाव नोदणीची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2020
देणगीदारास 80G नियमाअंतर्गत आयकरात सूट मिळेल.
१३, अ सह्याद्री नगर, जुना होटगी नाका, विकास नगर, सोलापूर – 413 003. फोन नं.: (0217) 2322480.
nifoundation 96577 09710 lokmangalfoundation.com lokmangalgroups@gmail.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *