दक्षिण सोलापूर .दि.५(प्रतिनिधी )तालुक्यातील भंडारकवठे येथील बाळासाहेब नामदेव कमळे( वय-५१) यांचे अपघाती निधन झाले .
बाळासाहेब कमळे हे ग्राम विकास अधिकारी म्हणून तडवळ(ता.अक्कलकोट) येथे कार्यरत होते .
मंगळवार दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तडवळ गावातील कार्यालयातील शासकीय कामकाज उरकून आपल्या मोटारसायकलवरुन ते भंडारकवठे आपल्या मूळगावी निघाले होते . विजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नांदणी गावाजवळ अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटारसायकलवरुन खाली पडून ते गंभीर जखमी झाले, त्यांना सोलापूर येथील आश्विनी खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डोक्याला जबर मार लागल्याने ते तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत होते , आज अखेर सोमवार दि.५ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राण ज्योत मावळली.त्यांच्या पश्चात आई-वडील.पत्नी. दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे .