Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

 MH13News Network

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवारी दि.3 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील 171 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 92 पुरुष तर 79 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत तब्बल अकरा हजार 375 महिलांनी कोरोनावर मात केलीय. जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेऊन तब्बल 28 हजार 856 जण बरे झाले आहेत त्यामध्ये 17,481पुरुषांचा समावेश होतोय.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 123आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 3पुरुषांचा समावेश होतोय.

आज एकूण 3181 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3010 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 575 इतकी झाली आहे. यामध्ये 19,506 पुरुष तर 12069 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 935 जणांचा मृत्यू झाला आहे यात 668 पुरुष तर 267 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1784 आहे .यामध्ये 1357 पुरुष तर 427 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 11 तर ग्रामीण 14

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 0

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 20

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 54

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 3

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 14

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 8 ग्रामीण 42

सांगोला – नागरी 2 ग्रामीण 5

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 7

आजच्या नोंदी नुसार नागरी -22 तर ग्रामीण भागात 149 असे एकूण 171 कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *