Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापूर (प्रतिनिधी)

कोरोनाच्या संकटातून संधी निर्माण करून चुंब (ता. बार्शी) गावांमधील काही कुटुंबांना रोजगार मिळावा, गावाची ओळख एका चांगल्या दिशेने व्हावी यासाठी गावात आपण ट्रेकिंग चालू करत आहोत, अशी माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर समजल्या जाणार्‍या चुंब गावाला शुक्रवारी आ. देशमुख यांनी भेट दिली व ग्रामस्थांसोबत वनसंवाद साधला. ते म्हणाले की, चुंब गावाला निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेली असूनही हे गाव दुर्लक्षितच होते. परंतु सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तसेच व्यवसाय निमित्ताने व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या निमित्ताने आलेले तरूण भूमिपुत्र, ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून खूप काम केले. उन्हाळ्यामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसत जमीनीवर जी पाण्याची भांडी तयार केली होती, ती आता तुडुंब भरलेली आहेत व त्यावर निसर्गाने हिरवाईची अतिशय मनमोहक सुंदर झालर चढवलेली आहे. हे सर्व आपल्या पुरते मर्यादित न ठेवता गावाबाहेरील लोकांनाही दाखवा, गावाची माहिती इतरांना द्या. कोरोना महामारीमध्ये लोकांना गर्दीच्या ठिकाणांपेक्षा आपले मिनी महाबळेश्वर नक्कीच मनात घर करेल,असेही देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *