सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरुवारी नवे कोरोनाबाधित 41 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 41 पैकी 24 पुरुष, 17 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 1177 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 40 हजार 373 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 419 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1582 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1541 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 42 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1177 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 38 हजार 777 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
होम क्वांरटाईन – 2503
एकूण तपासणी व्यक्ती- 506188
प्राप्त अहवाल- 506041
प्रलंबित अहवाल- 147
एकूण निगेटिव्ह – 465669
कोरोनाबाधितांची संख्या- 40, 373
रुग्णालयात दाखल – 419
आतापर्यंत बरे – 38,777
मृत – 1177
Leave a Reply