MH13 NEWS NETWORK
जागतिक महिला दिन व जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त डॉक्टर रघोजी किडनी अंड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापुर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ते गुरुवार दिनांक ७ ते ११ मार्च सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत या आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्य अतिथी जामगोंडी सर व सौ जामगोंडी मॅडम, डॉक्टर श्रीराम पिलगुलवार व सौ. पिलगुलवार.
या शिबिरामध्ये मासिक पाळीत अनियमितता, अंगावरून सतत पांढरे जाणे, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे, गर्भधारणेचे नियोजन करण्यात अडचण, योनी स्त्राव :अंग खाली सरकल्या सारखे वाटणे, मूत्र समस्या : मूत्र गळती, लघवी करण्याची वारंवार इच्छा, लघवी पूर्ण न झाल्यासारखे वाटणे इतर स्त्री रोग समस्या व सल्ला देण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत गरजू पेशंटला याचा लाभ मिळणार आहे आहे.
डॉक्टर निहारिका रघोजी पिलगुलवार यांनी सोलापूरकरांना या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाची प्रस्ताविका जगदीश नालवार यांनी केली व महेश्वर निम्बर्गी व सुनील कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास डॉ. निहारिका रघोजी पिलगुलवार, डॉ. विजय रघोजी, डॉ. नवनाथ फुलारी, डॉ. गजानन पिलगुलवार, डॉ. संगमेश्वर पाटील उपस्थित होते.
शिबिराचे स्थळ : डॉक्टर रघोजी किडनी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोहिते नगर, होटगी रोड, सोलापुर.