Big9 News Network
सध्याला मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सोशल मीडियावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आवाज माझा नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली जात आहे.
या ऑडिओ मध्ये जिल्हाधिकारी यांना मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, यासह आरोग्यविषयक घ्यावयाच्या काळजी साठी दिलेल्या आदेशांचे मुद्दे आहेत.
त्यांनी असं दिलंय स्पष्टीकरण…
मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.
An audio clip in my name is currently going viral on social media about taking action against those who do not use masks. But the voice in that clip is not mine. Hence the clarification.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राबविण्यात येणाऱ्या नियमावलीचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. त्या संदर्भात आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तो माझा आवाज नाही नसल्याचे स्पष्टीकरण दिले. अशा कोणत्याही गोष्टीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.