Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भरातील विद्यार्थी परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोना मुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अशा रास्त मागण्या करत आहेत, धुळे येथे याच मागण्या पालक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर मांडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत अमानुष मारहाण करण्यात आली, गोर गरीब विद्यार्थ्यांवरील या मारहाणीचा भारतीय जनता युवा मोर्चा वतीने आज सोलापूरात  निषेध करण्यात आला. यावेळी निवेदनाद्वारे या मागण्या करण्यात आल्या.

महाराष्ट्रातील अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे याचा विचार करता विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चे ३०% शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. तसेच उर्वरित आकारण्यात येणारे शुल्क हप्त्यामध्ये  भरण्याची सुविधा उपलब्ध करावी, अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे. अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे. तसेच परिक्षेबाबाबत या धोरणाच्या पातळीवरील घोळामुळे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्या सर्व विद्यार्थांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे.

याच  मागण्यांसाठी दि. 26 ऑगस्ट 2020 रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांनी पालक मंत्री अब्दुल सत्तार यांची वेळ मागितली परंतु असंवेदनशील पालक मंत्र्यांनी भेट नाकारली, यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना समोर स्वतः च्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला;यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करण्यात आली, हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे, अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.

महाराष्ट्रात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती आहे, कोरोना च्या काळातही विद्यापीठ व राज्यशासन विद्यार्थ्यांची व पालकांची लूट करत आहे, चुकीच्या निकलांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप उच्च शिक्षण मंत्र्यांनी केले आहे, याची जबाबदारी स्वीकारत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयसामंत यांचा राजीनामा घेण्यात यावा.

तरी वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भर याहून तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी युवामोर्चेचे संघटन सरचिटणीस सागर अतनुरे,संदीप जाधव,अक्षय अंजिखाने,समर्थ बंडे,प्रविण दर्गोपाटील,सचिन कुलकर्णी, सुधाकर नराल,यतीराज होनमाने,अभिषेक सुरवसे,किरण जाधव,शुभम कुदळे,प्रथमेश कोरे,अनिल अंजनाळकर,गणेश साखरे,शिवशरण साखरे,श्रीपाद इराबत्ती, प्रतीक आडम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *