Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक कार्य काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत : अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा भावी पिढीसाठी आदर्शवत : सक्षणा सलगर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वाखाणण्याजोगे आहे.

राष्ट्रपुरुषांचे पुतळे काही पुतळे नसतात तर ते येणाऱ्या पिढीसाठी आदर्श असतात.१८ व्या शतकात अहिल्यादेवी यांनी विधवांना अधिकार दिले आहेत.त्यामुळे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथे त्यांचे अध्यासन केंद्र होणे गरजेचेच आहे.एवढे मोठे कार्य असताना अहिल्यादेवी होळकर यांना केवळ महाराष्ट्रापुरते सीमित ठेऊन चालणार नाही.त्यामुळे सोलापुरात केवळ अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारून चालणार नाही तर अध्यासन केंद्र होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने थेट अध्यादेशच काढला आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा आणि अध्यासन केंद्र उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर सक्षणा सलगर यांनी नुकतीच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांची भेट घेतली.त्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि   कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी प्रयत्न केल्याबद्धल सक्षणा सलगर यांचा विद्यापीठासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा च्या वतीने सत्कार केला,यावेळी सलगर बोलत होत्या.

विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी वर्गणी काढण्याचे ठरल्याचे समजताच संताप आला.समितीमधील सदस्यांनी हा लांच्छनास्पद प्रकार केल्याचे समजले.खरे तर विद्यापीठ हे सरकारच्या अखत्यारीत असताना आणि सरकारच्या पैशातून पुतळा उभारणे गरजेचे असताना वर्गणी काढणे आपल्याला पटले नाही.त्यामुळे आपण तत्काळ खासदार सुप्रियाताई सुळे यांची १४ ऑगस्टला भेट घेतली.त्यांनी मनावर घेऊन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सांगून १८ ऑगस्टला आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत बैठक लावून सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ येथे अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा आणि अध्यासन केंद्र होण्यासाठी केवळ आदेशच काढला नाही तर ऑक्टोबर महिन्यात कार्यक्रम ठेवला असल्याचे सक्षणा सलगर यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींच्या नावाने अध्यासन केंद्र व अश्वारूढ पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याचबरोबर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात येत्या ऑक्‍टोबरमध्ये भूमिपूजन सोहळाही होईल, असेही सलगर यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, आमदार रोहित पवार, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने आणि कुलसचिव डॉ. विकास घुटे यांचा ऑनलाइन बैठकीत सहभाग होता.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र आणि पुतळा उभारण्यासाठी दोन कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली असल्याचे सक्षणा सलगर यांनी सांगितले.

सक्षणा सलगर यांच्या सत्काराप्रसंगी भारत जाधव संतोष पवार सुहास कदम आरती हुळ्ळे मिलिंद गोरे प्रमोद भोसले,युवराज माने श्याम गांगर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “थेट अध्यादेशच |अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा भावी पिढीसाठी आदर्शवत : सक्षणा सलगर  

  1. छत्रपती केने says:

    आनंदाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *