राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी भाजपच्यावतीने दक्षिण तालुका मतदारसंघात नवीन मतदारांसाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे नोंदणी अभियान होणार आहे. दक्षिणमधील सर्व 251 मतदान केंद्रावर ही नोंदणी होणार आहे. नवीन मतदार हे सुदृढ लोकशाहीचा आधार असतात. कार्यक्षम जनप्रतिनिधी निवडून यावेत व सुयोग्य शासन व्हावे ही मोठी जबाबदारी मतदारांवर असते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, यात सर्वांनी योगदान द्यावा, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले आहे.