Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे पोलीस अधीक्षक पथकाने ऑनलाइन मटका जुगार चालू आहे व येथील गोपाळ मदुरे यांच्या शेतात पत्राशेडमध्ये काही लोक मोबाइलवर कल्याण नाइट नावाचा मटका जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळताच जुगार अड्डयावर छापा टाकून ११ जणांकडून ४ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोबाइलवर मटका घेऊन गुगल पेवरून पैसे घेत असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल फोन, मोटारसायकली, लेसर प्रिंटर, १० वह्या, ५ रजिस्टर असा एकूण ४ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकातील पोलीस कर्मचारी दत्तात्रय राजेंद्र झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सतीश गोपाळ मदुरे ( वय २९ ), लक्ष्मण रामचंद्र झेंडेकर ( वय ३० ), लक्ष्मण आळप्पा केरूर ( वय २९ ), तम्माराय बंडप्पा कुंभार ( वय २८ ), विनायक गोवर्धन झेंडेकर ( वय १८ ), सुनील सिद्राम झेंडेकर ( वय १८ ), नागनाथ बसवराज कुंभार ( वय २४ ), सिद्राम मनोहर मदुरे ( वय ३५ ), परशुराम रामगोंडा कोळी ( वय ३५ ), जटप्पा चिदानंद कोळी ( वय ३८ ), संतोष गोपाळ मदुरे ( वय ३०, सर्व रा. टाकळी, ता. दक्षिण सोलापूर ) या ११ जणांवर मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक पथकाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी मदने, भुईटे व हेमाडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *