Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला. याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला होता. आता त्याच मैदानावर भारताने त्याच्यापेक्षा मोठा विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. इंग्लंड समोर ४२९ धावांचे अशक्य असे लक्ष होते तर भारताला विजयासाठी फक्त ७ विकेटची गरज होती. इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर संपुष्ठात आला. भारतीय संघाच्या या विजयाचा हिरो ठरला तो अश्विन पहिल्या डावात पाच, दुसऱ्या डावात ३ विकेट आणि शतकासह त्याने विजयाच महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर अक्षर पटेलने पदार्पणात पाच विकेट घेतल्या.

चौथ्या दिवसाची सुरूवात झाली तेव्हा इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज होती आणि भारताला फक्त ७ विकेट हव्या होत्या. गोलंदाजांसाठी अनुकुल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी पाहूण्या इंग्लंड संघाला फिरकीची कमाल दाखवून दिली. इंग्लंडने कालच्या ३ बाद ५४ धावसंख्यवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली.

संपूर्ण सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फिरकीवर नाचवणाऱ्या अश्विनने चौथ्या दिवशी पहिला धक्का दिला. त्याने लॉरेन्सला २६ वर बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्सला ८ धावांवर बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. स्टोक्सला बाद करण्याची अश्विनची ही १०वी वेळ ठरली आहे. तो बाद झाले तेव्हा इंग्लंडची अवस्था ५ बाद ९० अशी होती.

स्टोक्सच्या जागी आलेल्या ओली पोपला अक्षरने ८ धावांवर माघारी पाठवले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी कुलदीप यादवने बेन फोक्सला बाद करून इंग्लंडला सातवा धक्का दिला. यादवची या सामन्यातील पहिली विकेट ठरली. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरने कर्णधार जो रूटला बाद करून भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रूटने ३३ धावा केल्या. रुटने गेल्या तीन कसोटीत सलग तीन शतक केली होती. ज्यात दोन द्विशतकाचा समावेश होता.

दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेलने पाच विकेट घेतल्या. पदार्पणाच्या कसोटीत पाच विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली.

भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्माने धमाकेदार १६१ धावा केल्या होत्या. ज्यामुळे संघाला ३२९ धावांपर्यंत मजल मारता आली. यात अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी योगदान दिले होते. इंग्लंडचा पहिला डाव फक्त १३४ धावांवर संपुष्ठात आल्या. त्यांच्याकडून बेन फोक्सने सर्वाधिक ४२ धावा केल्या. अश्विने पाच फलंदाज बाद केले. भारताच्या दुसऱ्या डावात अश्विनने शतकी खेळी केली. तर कर्णधार विराटने अर्धशतक केले.

स्कोअरबोर्ड-

भारत – ३२९ आणि २८६

इंग्लंड- १३४ आणि १६४

कसोटी मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना अहमदाबाद येथील मोटेरा मैदानावर होणार आहे. तिसरा कसोटी सामना डे-नाइट असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *