Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

हैद्राबाद : दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. जयप्रकाश रेड्डी हे तेलुगू चित्रपटामधील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेते म्हणून ओळखले जात होते.

jaiprakash readdy

जयप्रकाश रेड्डी हे 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरलीआहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.‘प्रेमिचुकुंदम रा’, ‘गब्बर सिंह’, ‘चेन्नाकेशवारेड्डी’, ‘सीथाया’ आणि ‘टेंपर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

जयप्रकाश रेड्डी गुरू यांचं निधन झाल्यामुळे तेलुगू चित्रपट आणि रंगमंचाने एक हिरा गमावला आहे. गेले कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि स्मरणात राहतील असे चित्रपट दिले. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असं ट्विट करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनी रेड्डींना आदरांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *