Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मोहोळ,दि.२७ : मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीकडून मोहोळ पोलिसांनी सहा मोटारसायकली जप्त केल्या असून दोन अल्पवयीन मुलांसह अन्य दोन अशा चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहोळ हद्दीमध्ये गस्त घालत असताना कुरूल रोड परिसरात टोलनाका येथे एक इसम चोरीची गाडी घेऊन थांबल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला तेथे पाठवून संशयिताजवळील मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने ती चोरून आणल्याचे लक्षात आले.

त्याने कुरूल येथे लावलेल्या एकूण मोटारसायकली दाखवल्या. त्याच्याजवळील मोटारसायकलबाबत विचारणा ५ केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता दत्तात्रय शिवाजी देवकते ( रा. बीबीदारफळ, ता.उत्तर सोलापूर ), गंगाधर विठ्ठल अर्जुन ( रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट ) व अन्य दोघे अल्पवयीन अशा चौघांची नावे निष्पन्न झाली.

त्यांनी ६ मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे अधिक तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, डीबी पथकातील पितांबर शिंदे, प्रवीण साठे, हरिदास थोरात, गणेश दळवी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *