कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येणार हे स्पष्ट आहे, असे संकेत राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. तरीही कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असे राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.
”आम्ही या सर्व गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत. दवाखाने सज्जता, वैद्यकीय सुविधा आणि औषधांचा साठा मुबलक आहे. तरी देखील या लाटेची तीव्रता किती आहे? कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाला आहे का? या सर्व बाबींवर आरोग्य विभागाचं बारीक लक्ष आहे. तरी नागरिकांनीही काळजी घ्यावी”, असं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे.
त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर राज्यातील डॉक्टर, सरकारी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे, दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी द्यावी, घरी राहा सुरक्षित राहा असं आवाहन देण्यात आली आहे.
Leave a Reply