Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

पंढरपूर,दि.4 : विक्रीसाठी छुप्या पध्दतीने गुटखा घेऊन जात असताना शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पंचवीस लाख रुपयांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर दत्तात्रय महाजन ( चालक- रा. नागझरवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) , रवींद्र रामचंद्र दिवार ( चालक – रा . आळंद मातोबा, ता. हवेली, जि . पुणे ), योगेश काळभोर ( साठा मालक- रा. लोणीकाळभोर ), विष्णू प्रजापत ( वाहनमालक ) व नीलेश काळभोर ( वाहनमालक ) या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहर पोलिसांना गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार,2 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सरगम चौकात तपासणी केली जात असताना एम.एच .12 एस.एफ .4146 व एम.एच .12 क्यु.डब्ल्यू 857 या दोन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधित सुपारी असल्याचे आढळून आले. दोन वाहनांत 9 लाख 35 हजार रुपयांचा विमल पानमसाला ( लहान पाच हजार पाकिटे, 1 लाख 65 हजारांची तंबाखू ( लहान ) पाच हजार पाकिटे, 7 लाख 92 हजारांचा विमल पानमसाला मोठा ) चार हजार पाकिटे, 88 हजारांची तंबाखू ( मोठा ) चार हजार पाकिटे, 4 लाख 3 हजार 200 चा आरएमडी पानमसाला व 1 लाख 34 हजार 400 ची सुगंधित तंबाखू आदी माल आढळून आला. तसेच दोन छोटा हाती किंमत दहा लाख रूपये असा एकूण 35 लाख 17 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनास कळविले. त्यानुसार सोलापूर येथून प्रशांत कुचेकर यांनी येथे येऊन गुन्हा दाखल केला. सदर गुटखा कोणाकडे विक्रीसाठी जात होता, तो कोठून मागवण्यात आला, आणखी साठा आहे का तसेच यामध्ये भागीदार कोण आहेत का याचा तपास शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *