Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने  महिला दिन पारंपारिक पद्धतीने सत्कार वगैरे करून साजरा न करता महिला दिनाचे औचित्य साधून  केगाव येथे गोरगरीब , निराधार पाच महिलांना अन्न, वस्त्र व निवारा या जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जोपासत आगळ्या वेगळ्या पद्धतीने गरीब महिलांना शुभेच्छा दिल्या.

केगाव येथे झोपडीत राहणाऱ्या गरीब निराधार महिलांना जगण्यासाठी पुष्पगुच्छ यापेक्षाही अन्न, वस्त्र , निवारा गरजेचा आहे. या उद्देशाने या महिलांना अन्न (गहू, ज्वारी, शेंगा, तेल पाकिट, साखर, चनादाळ),  वस्त्र ( साडी, ब्लाऊज पिस, परकर),  निवारा ( ब्लँकेट व चटई) अशा जीवनावश्यक वस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा माहेश्र्वरी युवा संघठनाचे मेबंर गोविंद बंग, प्रशांत मालानी, सुहास लाहोटी, राहुल सोनी, मयूर परमशेट्टी, रामानुज होलाणी, मोनीष मुरजानी, मयुर करवा, दिपक भोसले, संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, शोभा घंटे, शंकरव्वा जमादार, भाग्यश्री वंजारे, सायली गायकवाड, माधुरी चव्हाण, रुचा चव्हाण, मल्लिकार्जुन यणपे, सुरेश लकडे, प्रा.गणेश लेगंरे, नितीन कुलकर्णी, सिध्दाराम कासे, अभिजीत होनकळस, शुभम हंचाटे, ओंकार भावसार आदींनी परिश्रम घेतले.

 चौकट :

महिला दिनी विविध कार्यक्रम घेतले जातात. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुरस्कार, सत्कार व प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात आले. मात्र यावर्षी उपेक्षित, गरीब , निराधार अशा झोपडीत रहाणाऱ्या महिलांना रोजचे जीवन जगण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या वस्तू देऊन आधार देण्याचा प्रयत्न श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने केला , अशी भावना प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *