न्यायालयात सुनावणीस आरोपी सतत गैरहजर असल्यामुळे आरोपी विरूध्द कोर्टाचा अटक वॉरंटचा आदेश

 

चेक बॉऊन्स प्रकरणात आरोपी विकास सुभाष इंगळे रा.अभिमानश्री कमरर्शिअल कॉम्प्लेक्स, मुरारजी पेठ, सोलापुर यांचे विरध्द सोलापुर येथील मेहरबान प्रथम
वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम एन राठोडे न्यायाधिश मॅडम, यांनी आरोपी विरुध्द मेहरबान कोर्टात तारखेस सतत गैरहजर राहल्यामुळे अटक वॉरंटचा आदेश करण्यात आलेला आहे.

यात सविस्तर हकीकत अशी की,

फिर्यादी अक्षय नगरी आणि साईप्रभा नगर, रिअल इस्टेटचे प्रोप्रायटर राजु अन्नम रा.जुना विडी घरकुल, सोलापुर यांचेकडुन आरोपी विकास इंगळे यांनी तीन लाख रुपये हातउसने मागितले होते. रक्कमेच्या परतफेडीपोटी आरोपी इंगळे यांनी फिर्यादी अन्नम यांस तीन लाख रुपयेचा चेक दिले होते व सदरचा चेक बॉऊन्स झाल्यामुळे यातील फिर्यादी राजु अन्नम यांनी सोलापुर येथील मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टात चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अन्वये आरोपी विकास सुभाष इंगळे यांच्या विरुध्द फौजदारी खटला दाखल केले.

सदर खटल्यास मुख्य सुनावनीवेळीस आरोपी इंगळे हा सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे फिर्यादी तर्फे ॲङ श्रीनिवास कटकुर यांच्या मार्फत फौजदारी प्रकिया संहिता कलम ७० अन्वये अटक वॉरंटचा अर्ज मे. न्यायालयात दिले असता. याकामी आरोपी तारखेस गैरहजर असल्यामुळे सदर खटल्यास विलंब होत आहे. असे निदर्शनास आणुन दिले, त्यामुळे मेहरबान कोर्ट आरोपी विरुध्द अटक वॉरंटचा आदेश मंजुर करुन संबंधित फौजदार चावडु पोलिस स्टेशनच्या पोलिसांना आरोपीस अटक करण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे.

याकामी फिर्यादी अक्षय नगरी रिअल इस्टेटचे प्रोप्रा.राजु तुळशीदास अन्नम यांच्यातर्फे अँड श्रीनिवास कटकुर व अँड किरण कटकुर यांनी काम पाहिले.