Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे. आज 2 हजार 628 अहवाल प्राप्त झाले आहेत त्यामधील 2340 रिपोर्ट निगेटिव्ह असून 288 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज शुक्रवारी ग्रामीण भागातील तब्बल 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 167 पुरुष तर 121 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 244 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7060 इतकी झाली आहे. यामध्ये 4238 पुरुष तर 2822 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 197 जणांचा मृत्यू झाला आहे यात 136 पुरुष तर 61 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2769 आहे .यामध्ये 1699 पुरुष 1070 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4094 यामध्ये 2403 पुरुष तर 1691 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट 7 बार्शी 48 करमाळा 10 माढा 3 माळशिरस 38 मंगळवेढा 18 मोहोळ 13 उत्तर सोलापूर 1 पंढरपूर 126 सांगोला 17 दक्षिण सोलापूर 7 असे एकूण 241पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अक्कलकोट 1 ,बार्शी 1 ,पंढरपूर 1मधील एक व्यक्ती मरण पावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *