Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पुणे विभागात पाच हजार ६४७ सदनिकांसाठी म्हाडाच्या वतीने सोडत काढण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.

सदनिका किती?
प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्य़ात म्हाळुंगे-चाकण (५१४), तळेगाव दाभाडे (२९६), सोलापूर जिल्ह्य़ात गट नं. २३८/१ (२३९), करमाळा (७७) तर सांगली येथे स.क्र.२१५/३ येथे ७४ अशा एकूण ९६१ सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. म्हाडाअंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी (८७), पिंपरी वाघेरे (९९२) अशा १०७९ सदनिका आहेत. तसेच सांगली  येथे १२९ सदनिका आहेत.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत पुणे जिल्हयात म्हाळुंगे येथे १८८०, दिवे येथे १४ तर सासवड येथे ४ सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्य़ात ८२ सदनिका आहेत, अशा एकूण १९८० सदनिका आहेत.

२० टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे ४१०, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे १०२० तर कोल्हापूर महानगरपालिका येथे ६८ अशा एकूण १४९८ सदनिका आहेत.

या सर्व सदनिका  अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी  उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यतील राधानगरी येथील ६८ भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१० डिसेंबर ते ११ जानेवारी रोजी सायंकाळी पाचवाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. तर १२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *