Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार स्विकारले नंतर अवैद्य व्यवसायवर कारवाईची विशेश मोहीम अंतर्गत श्रीमती तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, [उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष गायकवाड, अक्कलकोट विभाग,

अक्कलकोट यांचे मार्गदर्शनाखाली काल दिनांक 23/01/2021 रोजी पोनि श्री जाधव, सपोनि राठोड, पोहेका/78 राम पवार, पोहेकॉ/288 मल्लीनाथ कलशेट्टी पोना/1691 विरभद्र उपासे, पोना/ 257 संजय पांढरे,पोना/486 लक्ष्मण कांबळे, पोना/567 राजु कोळी, पोकॉ/422 भाउ सरवदे, मपोका/1906 सोनकांबळे, मपोकां/1410 सुरवसे, पोको/2001 सुतार यांनी सर्वांनी मिळून मौजे पानमंगरुळ ता. अक्कलकोट येथील रहिवाशी 1) लकप्पा भिमशा पुजारी वय 60 एका पायांने अपंग 2) रामचंद्र भिमशा पुजारी वय 40 (दोघे राहणार पानमंगरुळ ता. अक्कलकोट) यांचे घरात व शेतात दिनांक 23/01/2021 रोजी 19/30 वाचे पुर्वी घरात 6,51,810 (सहा लाख एक्कावन हजार आठशे दहा रुपये) रुपये किमतीचे सुकवलेला (वाळलेला) गांजा 21.781 ग्रॅम, गांज्याची झाडे त्यांचे वजन 62 किलो असे एकूण 83.781 किलो ग्रॅम गांजा यांनी आपल्या शेतात गांज्याचे पिक घेवुन ती वाळवुन विक्री करण्याचे इराद्याने त्याचे रहाते बाळगलेल्या अवस्थेत मिळून आलेने त्यांचे विरुध्द नारकोटीक्स ड्रय अँड सायकोट्राफीक सबस्टन्स ॲक्ट 1985 चे कलम ৪(क),20(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन त्याचा तपास पोनि श्री जाधव सो, हे करीत असुन सदर कारवाईत वर नमुद पोलीस ठाणेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी कारवाईत भाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *