‘टॅलेंट हंट शो’ मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ तेवढेच नाही तर चित्रपटद्वारेही तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या नव्या फोटोशूटची सध्या इंस्टाग्रामवर फार चर्चा आहे.
फोटोग्राफर विक्रांतने प्राजक्ताचे हे नवीन फोटोशूट केले असून त्यामध्ये प्राजक्ताचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. त्यातला एक फोटोमध्ये सध्या चर्चेत असलेला पोलका डॉट टॉप प्रोजेक्ट ने परिधान केलेला पाहिला मिळत असून त्यावर तिचा रेट्रो लूक शोभून दिसतोय. ‘सारी दुनिया हारी हम से… हम तुझपे दिल हारे, गहरी नैनोवाले… लहरी लहरी नैनोवाले…’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोला दिला आहे.
तर दुसरा फोटोला ‘बचके रहना रे बाबा… तुझपे नजर है,’ या गाण्याच्या ओळी तिने कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे. ओळींप्रमाणे प्राजक्ताची नजर या फोटोमध्ये पहायला मिळतेय. प्राजक्ताने 2011 मधील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रियालिटी शोमधून टीव्हीवरील प्रवासाची सुरुवात केली.
मॉडलिंग करत असतानाच प्राजक्ताला ललित प्रभाकरसोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे प्राजक्ता प्रसिद्धीच्या झोतात आली.या मालिकेतले तिची मेघनाची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.