Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापुरातील गणेशोत्सव नेहमीच भव्यदिव्य आणि दिमाखदार असतो. राज्यातील नागरिकांचे लक्ष सोलापुरातील विविध अशा देखाव्याकडे लागून राहिलेले असते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सादरीकरणाला जरी गालबोट लागले असले तरी उत्साह कमी होईल तो गणेशभक्त कसला…!

शहरातील एका कुटुंबातील सदस्यांनी थेट महिष्मती साम्राज्य घरातील बाप्पांच्या सेवेसाठी निर्माण केले, तेही अवघ्या तीनशे रुपयांमध्ये.कार्डबॉर्ड, बॉक्स चा पुठ्ठा, led लाईट्स, याचा वापर करून घरातील इतर वस्तू वापरून केलं आहे.

शहरातील अशोक चौक परिसरातील बोल्ली मंगल कार्यालयाच्या पाठीमागे हे कुटुंब राहत असून त्यातील रमादेवी गाजुल(ह्या वर्षी 10 वी झालेल्या मुलीने, प्रवलीका मंचिकटला(3rd year Computer Engg Diploma, मधुसूदन मंचिकटला यांनी हा देखावा केला आहे.

या संकटकाळात सुद्धा गणपती साठी भव्य देखावा करण्याचे प्रयत्न करीत होतो. बाहुबली चित्रपटातील माहिष्मती साम्राज्य आम्हा सगळ्यांना खूप आवडले होते. याच पद्धतीचा देखावा घरगुती पद्धतीने आम्ही सादर केला. परिसरातील लोकांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

नरेश गाजूल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *