सार्वजनिक कोरोना लसीकरण करणारा इंग्लंड पहिला देश
इंग्लंडमध्ये मंगळवारी कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. जगातील पहिली लस एका महिलेला मिळाली आहे. उत्तर आयर्लंडमधील ९० वर्षीय मार्गारट कीनम यांना ‘फायझर/ बायोएनटेक’ ची पहिली लस टोचण्यात आली. मार्गरेट यांनी हा क्षण अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली. पुढील आठवड्यात ९१ वर्षांच्या होणार आहेत. कीनन म्हणाल्या आता क्रिसमस, नव्या वर्षाच्या उत्साहात सहभागी होईन. कोरोना संदर्भातील ही मोठी बाब समजण्यात येत आहे.
भारतीय वंशाच्या हरी शुक्ला यांचाही समावेश
विशेष म्हणजे भारतीय वंशाचे ८७ वर्षीय हरी शुकला यांनाही लस टोचण्यात आली आहे. हरी शुक्ला यांनी लसीकरणासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते.