Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

राज्यात बाधित रुग्णांच्या संख्येत पुणे सर्वात पुढे गेलं आहे.
शहरात करोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णांना स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सोमवारी पुणे महापालिकेचे व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांच्या वाहनाची तोडफोड केली.

Pune vasant More MNS

वसंत मोरे म्हणाले, “पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा अपयशी ठरले आहे. शहरातील खासगी रुग्णालये पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. या प्रश्नावर आजवर आम्ही महापालिकेच्या मुख्य सभेत आवाज उठविण्याचे काम केले आहे. मात्र, तरीदेखील सत्ताधारी आणि प्रशासन काहीच हालचाली करताना दिसत नाहीत.”

त्याही पुढे जाऊन रुग्णाला उपचारांसाठी रुग्णवाहिका किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी नातेवाईकांना तासन्-तास वाट पाहावी लागत आहे. रुग्णवाहिका मिळाली तरी रोजची मृतांची संख्या लक्षात घेता अंत्यसंस्कार करण्यास किमान चार तास लागतात.

फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून वसंत मोरे यांनी  अधिकाऱ्यांशी बोलत गाडी फोडली.हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *