Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

मराठा आरक्षणात स्थगिती मिळाल्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज (बुधवार दि.23) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली.

गोलमेज मराठा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते .10 ऑक्टोंबर ला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी यापुढे ‘थोबाड फोडो’ आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वयक समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. थोबाड फोडून आंदोलनाची सुरुवात कोणत्या नेत्या पासून करण्यात येणार हे मात्र महाडिक यांनी सांगितले नाही. यापुढे मराठा समाज गनिमी काव्याने आंदोलन करणार असल्याचे महाडीक यांनी सांगितले.

Maratha aarakshan

गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्वसहमतीने मांडण्यात आले त्यावर चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्यातून सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. आंदोलनाचे लोण आता राज्यभर पसरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *