Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूरातील अशोक चौकात भागातील एका इमारतीमध्ये अवैधरित्या मटका बुकीचा व्यवसाय चालविणारा भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी यास पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची माहिती घेऊन जप्तीच्या अनुषंगाने कारवाई सुरु केली होती. गुप्तहेरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक आंध्र प्रदेशात पोहचले. त्याची कूणकूण लागताच विजयवाडा येथून हैदराबादकडे पळून जाताना पोलिसांनी कामाठीला पहाटे आज बुधवारी साडेतीन वाजता अटक केली.

सुनील कामाठीच्या मालमत्ता जप्त करण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई सुरू केली होती.
अवैध मटका बुकीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून कामाठी हा फरार होता.मटका प्रकरणी आज पर्यंत तब्बल 288 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.तर 60 हून अधिकजणांना झाली अटक करून ताब्यात घेतले आहे.
आज बुधवारी पहाटे आंध्र प्रदेशातील मच्छल्लीपट्टणम- विजयवाडा येथून पळून जाताना पोलिसांनी पकडले
आंध्रात असल्याची माहिती पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली होती. अवैध मटका प्रकरणात न्यायालयाकडून सुनील कामाठीला 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sunil kamathi

सविस्तर हकीकत अशी की….
न्यू पाच्छा पेठेतील कोंचीकोरवी गल्लीत असलेल्या एका इमारतीवर 24 ऑगस्टला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती.अचानकपणे पडलेल्या छाप्यामुळे काहीजण पळून गेले, तर एका बुकीचा पळून जाताना इमारतीवरुन पडल्याने मृत्यू झाला.
या अवैध व्यवसायाचा मुख्य सूत्रधार भाजपचा नगरसेवक सुनिल कामाठी पोलिसांना चकवा देऊन पळून गेला.पोलिसांनी माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता परंतु त्यात यश मिळत नव्हते.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याबद्दलची माहिती कामाठीच्या कुटुंबातील सदस्यांकडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर न राहताच दोन जणांनी पलायन केले. त्यानंतरही कामाठी पोलिसांत हजर राहत नसल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली. दरम्यान, गुप्तहेरांकडून कामाठी आंध्र प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर, बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 26 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *