Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी दि.23 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 454 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 249 पुरुष तर 155 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 404 आहे. आज 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 14 पुरुषांचा आणि 2 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 3294 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2840 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 167 इतकी झाली आहे. यामध्ये 13,688 पुरुष तर 8479 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 618 जणांचा मृत्यू झाला आहे यात 431 पुरुष तर 187 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 940 आहे .यामध्ये 4 हजार 522 पुरुष तर 2452 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 14 हजार 575 यामध्ये 8732 पुरुष तर 5843 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 43 तर ग्रामीण 35

करमाळा –नागरी 12 ग्रामीण 10

माढा – नागरी 12 तर ग्रामीण 28

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 150

मंगळवेढा – नागरी 3 ,ग्रामीण 11

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 6

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5

पंढरपूर – नागरी 20 ग्रामीण 55

सांगोला – नागरी 12 ग्रामीण 40

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 12

आजच्या नोंदी नुसार नागरी -102 तर ग्रामीण भागात 352 असे एकूण 454 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *