माढा | ‘या’ चिमुकलीने पटकावला घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक

माढा /प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त Thank a Teacher या उपक्रमांतर्गत घेतलेल्या घोषवाक्य स्पर्धेत विद्यार्थी गटात माढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिला स्मतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

याकरिता मेघश्री हिस तिची आई मेघना गुंड व सुप्रिया ताकभाते यांचे मार्गदर्शन लाभले.विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्रकुमार गुंड यांची ती कन्या आहे.

यशाबद्दल तिचे अभिनंदन जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, उपशाखाप्रमुख मोहन कदम, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव, विस्ताराधिकारी बंडू शिंदे,केंद्रप्रमुख विष्णू बोबडे, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे,बाळू गुंड,सरपंच अरुण कदम, चेअरमन अनिलकुमार अनभुले, बालाजी गव्हाणे, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, गोरखनाथ शेगर,सुधीर गुंड,अमित चव्हाण, नेताजी उबाळे दिनेश गुंड,भारत कदम,अंकुश गवळी,विजय काळे,सतीश गुंड, समाधान कोकाटे,सज्जन मुळे,भिवाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

फोटो ओळी- कु.मेघश्री गुंड.