मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी महेश भैरू लोंढे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश दादा बागवे व कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश दादा बागवे यांच्या हस्ते पुणे येथे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे उपस्थित होते. महेश लोंढे हे सोलापूरच शहर युवक काँग्रेस सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाजातील तरुण तरूणीना मातंग एकता आंदोलन संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करून युवकांसाठी रोजगार शिबिर, वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे, गाव तिथे शाखा, समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस महेश लोंढे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मनोज लोंढे, साम्राज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ शिंदे, जितू कसबे, सचिन भोसले, निखिल पवार, अनिल वाघमारे, सागर अडसुळे सर्व उपस्थित होते.