दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मोडनिंब, अरण, पडसाळी, भेंड परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांच्या पुलावरून वाहत आहे. त्यामुळे दळणवळणास अडचण निर्माण झाली आहे. आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली दमदार असा पाऊस सकाळपासून सुरू आहे.पाऊस सतत सुरू आहे पावसामुळे ओढे भरून वाहताहेत ओड्यावर असणारे सर्व बंधारे भरून वाहत आहेत.
मोडनिंब वेताळ बाबा ओढ्याला खूप पाणी आल्यामुळे मोडनिंब ते करकंब रस्त्याच्या वरून पाणी वाहत आहे. त्याठिकाणीही रस्ता बंद झालेला आहे. अरण संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिराच्या पाठीमागून संत कुर्मदास महाराज मंदिरापासून लऊळ ला जाणारा रस्ता जोरदार पावसामुळे बंद झालेला आहे.अरण मधून मोडनिंब कडे जाणाऱ्या ओढ्यांना पावसाचे जास्त पाणी आल्यामुळे दोन ठिकाणी सर्विस रस्त्यावर पाणी आले आहे. या पाण्यामुळे याभागातील वाहतुकीची कोंडी झालेली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे या भागातील डाळिंब द्राक्षे बोर,कांंदा, बागायतदारांना मात्र फटका बसलेला आहे. तर टोमॅटो व पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे.