उस्मानाबाद शहरातील शेकापूर रोडवरील बालाजी नगर येथे स्वामी समर्थ मूकबधिर निवासी शाळेत शीघ्र निदान व उपचार केंद्र स्थापन करण्यात आले .
दिव्यांगांचे श्रद्धास्थान डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने व फित कापून केंद्राचे उद्घाटन उस्मानाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलचे स्पीच थेरॅपीस्ट गणेश चव्हाण ऑडिओलाजीस सुरज शिंदे, मनोज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्क्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शकील शेख होते
या कार्यक्रमास भिमराव पाथरूड, विठ्ठल व्होरडे, रेखा ओहोळ ,संजय म्हमाणे ,किरण जाधव, नागेश चव्हाण तसेच पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन हे सामाजिक अंतर राखुन व सेनेटायझरचा वापर करून व नियमाचे पालन करुन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी तर आभार विठ्ठल व्हॉर्दे यांनी केले.