बिहार विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील नावे आहेत. समावेश आहे. नुकतंच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे.
हे आहेत स्टार प्रचारक…
सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफन, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला , गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे.