शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी :
महा एनजीओ फेडरेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्ञी सन्मान पुरस्कार माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अँड .मिनलताई दादासाहेब साठे यांना जाहीर झाला आहे उद्या 8 मार्च सोमवारी जागतिक महिला दिनाचे आवचित्य साधून पुणे येथे स्नेहा देव गटविकास अधिकारी पुणे, आरती गोखले ZTCC समन्वयक पुणे, महा एनजिओ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, सहसस्थापक विजय वरूडकर ,संचालक मुकुंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पध्दतीने या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता कार्यक्रमाला होणारी गर्दी टाळण्यासाठी या संस्थेने पुरस्कार सोहळा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे ठरले आहे. मिनलताई साठे यांना , त्यांच्या कामाचे स्वरूप पाहुन अनेक संघटनांनी पुरस्कारने सन्मानित करून त्यांच्या कामाची पोच पावती या माध्यमातून देण्यात आली आहे.