Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

राजूबापू पाटील आणि दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर:- पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या भोसे गावातील पाटील कुटुंबावर कोरोनाने सर्वात मोठा घाला घातलाय. तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंतराव पाटील यांचे दोन चिरंजीव आणि एका सख्खा भावाचा कोरोनामुळे धक्कादायकरित्या मृत्यू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष,खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू बापू पाटील यांचं कोरोनामुळे सोलापुरात निधन झालंय.गुरुवारी मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.तालुक्याच्या राजकारणात आपला दबदबा ठेवणारे भोसे गावचे पाटील कुटुंबीय दहा दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळून आलं.

पहिल्यांदा राजु बापू पाटील यांच्या चुलत्यांचे कोरोना मुळे निधन झालं. त्यानंतर चारच दिवसांमध्ये राजू बापू पाटील यांचे धाकटे बंधू महेश पाटील यांचा कोरोनामुळे बळी गेला. महेश हे घरीच उपचार घेत होते मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात येत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वात धक्कादायक म्हणजे तालुक्याचे नेते राजू बापू पाटील यांचे देखील कोरोनाने आज मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान निधन झाले.

दहा दिवसाच्या अंतरात एकाच कुटुंबातील तीन कर्ते पुरुष कोरोनाचे बळी गेलेत.पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद घटनेने तालुक्यात देखील शोककळा पसरली.राजू बापू पाटील यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर तालुक्यांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *