आज लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी… जाणून घ्या महत्व

लक्ष्मीपूजन

अश्विन मावशीच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करतात आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी अख्यायिका आहे. समुद्र आणि ऐश्वर्या यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

हे आहेत लक्ष्मीपूजनाचे तीन मुहूर्त
आपल्या उद्योग-व्यवसायात व कुटुंबात, घरांमध्ये ऐश्वर्य प्राप्ती व्हावी यासाठी दिवाळी उत्सवात लक्ष्मीपूजनाला महत्त्व आहे. शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने या पवित्र दिवशी तयारी करण्यासाठी शुक्रवारपासूनच लगबग सुरू होती. दाते पंचांगानुसार शनिवारी लक्ष्मीकुबेर पुजनाच्या वेळा दुपारी 1:50 दुपारी 04:30 सायंकाळी सहा ते आठ वाजून पंचवीस मिनिटे व रात्री 9 ते 11 20 अशा आहेत

शहरातील बाजारपेठ, मधला मारुती, कस्तुरबा मार्केट परिसर, नवी पेठ, सुपरमार्केट ,लक्ष्मी भाजी मंडई, बाळे, विजापूर रोड ,भैय्या चौक या ठिकाणी पूजेचे साहित्य विक्रीचे स्टॉल सजले होते .झेंडूसह विविध फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती. लक्ष्मीपूजना बरोबर वही आणि चोपडी पूजनाला ही व्यापाऱ्यांमध्ये महत्त्व आहे. या खरेदीबरोबर संध्याकाळी स्वच्छता, सजावट व रोषणाई करण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू होते

नरक चतुर्दशी

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे, तेलाच्या मर्दन लावून स्नान केले जाते, त्यास अभंगस्नान असे म्हणतात. या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे.