मुंबई दि.18
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. राज्य सरकारने नियमावली देत खाजगी प्रवासी वाहतूक व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली होती. 20 ऑगस्टपासून एसटी बसला 50 टक्के प्रवाशांसह परवानगी देण्यात आली होती. एका सीटवर एक प्रवासी या पद्धतीने प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती.
आता महाराष्ट्र सरकारने आजपासून दि.18 सप्टेंबर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला एसटी बसला परवानगी दिली आहे.
प्रवाशांना प्रवासात मास्क वापरणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक असणार आहे. 50 टक्के प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळ तोट्यात होते. यावर पर्याय म्हणून पूर्ण जनतेसह प्रवासी वाहतूक करण्याला एसटी महामंडळाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
◆बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटाईझर वापरणं बंधनकारक आहे.
◆वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करण्यास मार्गस्थ करण्यात याव्यात.
◆लांब आणि मध्यम लांब पल्ल्याच्य बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीनं आरक्षण उपलब्ध आहे.
या निर्णयामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.