लॉज वर चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड; एका पीडित महिलेची सुटका…

सोलापूर : बस स्थानकासमोरील हॉटेल संतोष लॉज मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाने छापा टाकून दोघींवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर एका महिलेची सुटका केली गेली आहे.

हॉटेल संतोष लॉज या ठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची माहिती मिळाल्याने  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी बोगस गिराईक पाठवून छापा टाकला. रागिणी वीरपक्षप्पा मोदी (वय- ५०, रा. दक्षिण कसबा, चौपाड) या नावाच्या अंटीने श्रीमती कुसुम मनोहर मोरे (वय- ६६,  रा. मुरारजी पेठ , धरमशी लाईन) हिचे मालकीचे हॉटेल संतोष या ठिकाणी एका पिडीत महिलेस पैशाचे आमीष दाखवून, वेश्या व्यवसाय करिता प्रवृत्त केल्याचे आढळले गेले. पिडीत महिलेकडे अधिक चौकशी केली असता अंटी रागिणी ही पिडीतेस पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घेऊन तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत. त्या बदल्यात मिळणाऱ्या रकमेतून सदर पिडीतेस त्यांच्यात ठरलेली रक्कम देत असे.

अशा प्रकारे पिडीतेची शारिरीक पिळवणूक करून तिला वेश्या व्यवसाय करण्यात भाग पाडून, तिच्या कडून तिचे कमाईवर स्वतःची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने आरोपी रागिणी मोदी व कुसुम मोरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर पीडित महिलेला महिला आश्रमात ठेवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सांगितले. अशाप्रकारे सोलापूर शरद बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीचे कारवाई यापुढेही करण्यात येणार असून ती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे साळुंके यांनी सांगितले.