लोकमंगल बँकेतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम
सोलापूर (प्रतिनिधी)
लोकमंगल को.ऑप बँक व लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मकरसंक्रांतीचे औचित्य साधून यांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून सोलापूर पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर लाभल्या होत्या.
यावेळी लोकमंगल बँकेच्या संचालिका रेणुका महागावकर, पुष्पांजली काटीकर, नीता देशमुख व अंबुरे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन लोकमंगल बँक व्यवस्थापिका अनिता जगदाळे व बँकेतील महिला कर्मचाऱ्यांनी केले होते. सूत्रसंचालन श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. यावेळी लोकमंगल बँकेच्या महिला सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.