सोलापूर:- ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हलक्या व्यायामाची गरज असते हे ओळखून प्रभाग ९चे धडाडीचे नगरसेवक श्री नागेश वल्याळ यांनी नगरसेवक निधीतून साडेचार लाख रुपयांचे व्यायाम साहित्य स्व.लिंगराज वल्याळ क्रीडांगणात बसविले त्याचा शुभारंभ माननीय महापौर सौ.श्रीकांचना यन्नम व स्मार्ट सिटीचे सीईओ श्री त्र्यंबक डेंगळे पाटील यांच्या शुभहस्ते प्रभागाच्या नगरसेविका सौ.रामेश्वरी बिर्रू,सौ.राधिका पोसा तसेच ज्येष्ठ नागरिक श्री इंगळे साहेब, सुरेश चिक्कळी,श्रीनिवास दायमा उद्योजक जयंत होलेपाटील, दत्तूअण्णा पोसा,आनंद बिर्रू यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आला.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.महापौर व डेंगळेपाटील यांनी नगरसेवक श्री नागेश वल्याळ यांच्या उपक्रमाचे कौतुक करून यापुढे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच फिजिओथेरपीस्ट कु.व्यक्ता वल्याळ हिने येथे व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपण व्यायामासंबंधी सल्ला व मार्गदर्शन करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
नगरसेवक नागेश वल्याळ यांनी स्व.लिंगराज वल्याळ क्रीडांगणासाठी ज्या ज्या मान्यवर व्यक्तींचे योगदान लाभले त्या सर्वांचे भावनिक आभारासह उपस्थितांचेही आभार मानले.
या कार्यक्रमाचे संयोजन स्व.लिंगराज वल्याळ विचार मंचचे प्रमुख कार्यकर्ते प्रथमेश आनंदकर,रवी कालवा, कुमार सिंगराल, जगदीश कासेगांवकर, श्रीनिवास मंताटी,स्वन्ने, मनोज बाबले, आदीनी केले तर यशस्वी सूत्रसंचालन श्री नागेश सरगम यांनी केले.
Leave a Reply