शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आवचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ.रजनी सुरवसे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माढा महावितरणच्या मुख्य अभियंता प्रिया राठोड, कनिष्ठ अभियंता मृणाली मसराम उपस्थित होत्या. महिलांचा सन्मान या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना
अभियंता प्रिया राठोड यांनी प्रथम वेताळवाडीच्या सरपंच डाॅ. रजनी सुरवसे यांचे विविध क्षेत्रातील महिलांचे सन्मान
केल्या बद्दल आभार मानले. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाची उभारणी करून या उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती करावी ,केवळ चूल आणि मूल यात गुंतून नपडता बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत पुढे महिलांनी स्वावलंबी बनावे असे सांगितले यावेळी अभियंता मृणाली मसराम व सरपंच सुरवसे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. वेताळवाडी गावासह परिसरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र, मास्क, सॅनिटायझर, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी
ग्रामपंचायत सदस्या रतन सुरवसे, अश्विनी जाधव, सुनीता सुरवसे, ग्रामसेविका मनीषा शेंडेकर, माजी सरपंच जोशना राऊत उपसरपंच अँड . पांडुरंग खोत, प्रा.रवी सुरवसे, महेश पवार, दयानंद जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अँड. पांडुरंग खोत यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सुरवसे यांनी केले.