Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर शहरात आज सोमवारी दि.12 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 28 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 93 इतकी आहे.

आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 428 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 400 निगेटीव्ह आहेत.

आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9072 असून एकूण मृतांची संख्या 503 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 863 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7706 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *