Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.22 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 21 रुग्ण आढळले असून यामध्ये 15 पुरुष तर 6 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 26 इतकी आहे. दिवसेंदिवस टेस्टिंग कमी होत असल्याचे दिसून येत आहे.बुधवारी रात्री 12 पर्यंत सुद्धा केवळ 381 टेस्टिंग झाल्या असून संभाव्य धोका लक्षात घेता तपासणी वाढणे गरजेचे आहे.

आज गुरुवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 381 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 360 निगेटीव्ह आहेत.आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कुमठे गाव ,व्ही एम जी एम सी होस्टेल, रंगराज नगर ,रमणशेट्टी नगर, शेळगी, उमा नगरी मुरारजी पेठ, इंदिरानगर ,कस्तुरबा पार्क जवळ होटगी रोड, वामन नगर जुळे सोलापूर, गंगाधर हौसिंग सोसायटी, दमाणी नगर ,मुस्लिम पाच्छा पेठ जेल रोड जवळ, मिलिंद नगर बुधवार पेठ, विजापूर रोड ,गजानन नगर मजरेवाडी आणि गणेश नगर या परिसरातील बाधित व्यक्ती आढळून आल्या.

तुळजापूर वेस पूर्व मंगळवार पेठ परिसरातील 61 वर्षाची महिला आणि आशा नगर, एमआयडीसी रोड परिसरातील 33 वर्षाची महिला यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9346 असून एकूण मृतांची संख्या 522 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 588 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8236 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *